जय श्रीमंगलमूर्ति नमो पूर्ण कृपाळा ।
दीन दयाळा स्मरतां यावे रे बापा ॥धृ०॥
जयश्री सिद्धविनायक तो ज्ञानदीपा ।
इच्छा धरितां शक्ति पुरे निर्गुणस्वरूपा बह्या विष्णु त्रिपुराणें स्मरती बापा ।
स्मरती इन्द्रादिक शेषशाही यदचारी बह्मकुमारी ।
सहित यावें सहित तया वेळे बापा ॥१॥
हर हर विश्वपति परस्परा त्रैलोक्य दाता ।
ज्याचा चिरंजीव मोरया त्रिनेत्रसुता ।
विलंब न करी सत्वर यावें ह्रदयीं पद धरितां ।
यमचिंता प्राप्त होईल उपाय न चाले रे बापा ।
व्यास बोलले सत्यस्वभावें रे बापा ॥२॥
गणगंधर्व देवगण शंकर भोळा ।
समर्थ श्रीगुरू बृहस्पती ऋषींचा मेळा ।
नारदतुंबर स्मरती तंव रे जाणुन सोहोळा ।
प्रवेशले चतुर्भुज एकदंत जयवंत आलापुन श्रीराग ।
प्रथम देवा प्रेम न मायले मायबापा ॥३॥
पाहुन देवसभा तृप्त तुशी गणराया ।
जयजयकार पुष्प वर्षती वर महाराजा ।
संतमंडळीस विनवितो विठ्ठल राजा ।
जय गुरू सिद्धनाथ आदिनाथ सांप्रदाया ।
सगनभाऊ म्हणे रसिकपदीं लागुन गाई हरीगुण गाई रे बापा ।
जय श्रीमंगलमूर्ति नमो नमो पूर्ण कृपाळा दीनदयाळा स्मरता यावे रे बापा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel