घडि घडि घडि घडि कां तरी छळतो मशीं रे ? । अशी अन्यायी मी काय तुझी रे ? ॥धृ०॥

ऐशी मी लावण्ये नाजुक पुतळी । अंगि नवती भरज्वानी कवळी । जशी काय चाफ्याची कळी पिवळी । भ्रमरराया तू ये रे जवळी । घेइ सुवास आतां तरी ह्या वेळीं । आल्या लहरी ऋतुसमय काळीं । काय तरी करुणा येउं दे माझी रे ॥१॥

मी असतां नित तुमचे सेवेशीं । तरी कां अंतर देतां हो मशीं ? । कसे जातां हो तुम्ही परके अस्त्रिशीं ? । लावुनी करवत माझ्या जिवाशीं । चतुरपणाची नव्हे रीत अशी । अधिं वचनीं कां गोविलें मशीं ? । अर्जी परिसावी राजसा माझी रे ॥२॥

चित्त मनरंजना अरे मनमोहना । माझ्या रे जिवींच्या जाणसी खुणा । अशा हो मानसांतील कल्पना । मारुनी णब्रंत (?) तुमच्या त्रासेला । अशी कोण रांड ही तुमच्या हो नेमा । सादर होईल सेवेसी जाणा । अशी कोण ती सर करील माझी रे ? ॥३॥

अज्ञान तर म्हणे अशा या नेमासी । नारी चुकुं नको त्याच्या सेवेसी । बहु रितीनें की प्राणसख्यासी । समजावुन नेला रंगमहालासी । जाइ जुइ मोगरा तर्‍हा रे जिनसी । सुखानीं मज भोगा विलासी । सिदराम लहेरी कवि राज विराज रे ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel