पाली भाषेत :-

३४ सोचति पुत्तेहि पुत्तिमा (इति भगवा) गोमिको१ (१ म.-गोपियो, गोपिको.) गोहि तथेव सोचति।
उपधी हि नरस्स सोचना न हि सो सोचति यो निरूपधी ति।।१७।।

मराठीत अनुवाद :-


३४. “पुत्रवन्ताला पुत्रामुळें शोक होतो.” असें भगवान् म्हणाला, “त्याचप्रमाणें गाईच्या मालकाला गाईमुळें शोक होतो; कारण उपाधि माणसाला शोकदायिनी आहे व जो उपाधिरहित, तो शोक करीत नाहीं.” (१७)

धनियसुत्तं निट्ठितं।

धनियसुत्त समाप्त

पाली भाषेत :-

[३. खग्गविसाण-सुत्तं]


३५ सब्बेसु भूतेसु निधाय दण्डं (२ नि.-अहेठयं.)२अविहेठयं अञ्ञतरंऽपि तेसं।
न पुत्तमिच्छेय्य कुतो सहायं एको चरे खग्गविसाणकप्पो।।१।।


३६ संसग्गजातस्स भवन्ति१ (१ रो.-भवति स्नोहो.) स्नेहा स्नेहन्वयं दुक्खमिदं पहोति।
आदीनवं स्नेहजं पेक्खमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।२।।

३७ मित्ते सुहज्जे अनुकंपमानो हापेति अत्थं पटिबद्धचित्तो२ (२.म.-पटिबंधचित्तो.)।
एतं भयं सन्थवे पेक्खमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।३।।

३८ वंसो विसालो व३ (३. म.-च.) यथा विसत्तो पुत्तेसु दारेसु च या अपेक्खा४ (४ सी. अपेखा.)
वंसाकळीरो५ (५ सी.-वलीरो, अ.-वंसकळीरो.) व असज्जमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।४।।

३९ मिगो अरञ्ञम्हि यथा अबद्धो येनिच्छकं गच्छति गोचराय।
विञ्ञू६ (६. म.-विञ्ञु.) नरो सेरितं७ (७ निद्वे.-सेरि तं.) पेक्खमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।५।।

मराठीत अनुवाद :-

[३.खग्गविसाणसुत्त़]

३५. भूतमात्रांविषयीं दण्डबुद्धि सोडून त्यापैकीं एकालाही त्रास देऊं नये, (आणि) पुत्राचीहि आशा धरूं नये, मग सहायाची (मित्राची) गोष्ट कशाला? (आणि) गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१)

३६. संसर्ग घडल्यानें स्नेह उत्पन्न होतो. स्नेहापासून हें दु:ख उत्पन्न होतें. हा स्नेहापासून उत्पन्न होणारा दोष पाहून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२)

३७. मित्रसुहृदांना मदत करण्याच्या उद्देशानें आसक्तचित्त होऊन सदर्थ सोडून देतो. परस्पर प्रेमांत हें भय पाहून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३)

३८. विशाल वेळू जसा (इतर वेळूमध्यें) गुंतून जातो, तद्वत् पुत्रदारांची अपेक्षा होय. वेळूच्या मोडाप्रमाणें संलग्न न होतां गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (४)

३९. अरण्यांतील मोकळा मृग चरण्यासाठीं जसा यथेच्छ विहार करतो, त्याप्रमाणें सुज्ञ माणसानें आपली स्वतंत्रता जाणून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel