पाली भाषेतः-

७८१ सकं हि दिट्ठिं कथमच्चयेय्य। छन्दा१नुनीतो(१ म.-छन्दानतीतो.) रुचिया नि निविट्ठो।
सयं समत्तानि पकुब्बमानो। यथा हि जानेय्य तथा वदेय्थ।।२।।

७८२ यो अत्तनो सीलवतानि जन्तु। अनानुपुट्ठो२(२ म.-फुट्ठो.) च परेस३(३ म.-परस्स.) पावा४।(४ म.-पाव.)
अनरियधम्मं कुसला तमाहु। यो आतुमानं सयमेव पावा।।३।।

७८३ सन्तो च भिक्खु अभिनिब्बुतत्तो। इतिऽहं ति सीलेसु अकत्थमानो।
तमरियधम्मं कुसला वदन्ति। यस्सुस्सदा नत्थि कुहिंचि लोके।।४।।

मराठी अनुवादः-


७८१ कारण आपल्या पंथाचा ज्याला छंद लागला, आवडीनें जो त्यांत बद्ध झाला व आपण स्वीकारलेल्या पंथाप्रमाणें वागूं लागला, तो त्या पंथापलीकडे कसा जाईल? कारण तो जसें जाणेल तसेंच बोलेल.(२)

७८२ विचारलें नसतां जो प्राणी इतरांना आपल्या संप्रदायाची शीलव्रतें सांगतो, व आपल्या संबंधींच्याच गोष्टी बोलतो, त्याला सुज्ञ अनार्यधर्मी म्हणतात.(३)

७८३ पण जो शांत आणि अभिनिर्वृतात्म भिक्षु ‘माझे हे हे नियम आहेत’ अशी बडबड करीत नाहीं व ज्याला या जगीं कोणचेही उत्सद१ (१. ५१५ व्या गाथेवरील टीप पहा.) नाहींत, त्याला सुज्ञ अनार्यधर्मी म्हणतात.(४)

पाली भाषेतः-

७८४ पकप्पिता१(१ म.-का.) संखता यस्स धम्मा। पुरक्खता२(२ म.-पुरे.) सन्ति३ अवीवदाता।(३ म.-सन्तिमवी.)
यदत्तनि४(४ रो.-नी.) पस्सति आनिसंसं। तं निस्सितो कुप्प-पटिच्च५-सन्तिं।।५।।(५.-पटिच्च सन्ति.)

७८५ दिट्ठिनिवेसा६(६ म.-दिट्ठि) न हि स्वातिवत्ता। धम्मेसु निच्छेय्य७(७ म.-निगच्छेय्य.) समुग्गहीतं।
तस्मा नरो तेसु निवेसनेसु। निरस्सति८(८ म.-नि.-नदस्सति.) आदियातिच्च९(९ म.-च.) धम्मं।।६।।

७८६ धोनस्स हि१०(१० रो.-ही.) नत्थि कुहिंचि लोके। पकप्पिता दिट्ठि भवाभवेसु।
मायं च मानं च पहाय धोनो। स केन गच्छेय्य अनूपयो११(११ सी., म.-अनुपयो.)
सो।।७।।

मराठी अनुवादः-

७८४ जो स्पष्टपणें न दिसणार्‍या मिज्ञ पदार्थांची कल्पना करतो व त्यांनाच आपलें ध्येय समजतो, तो आपणांला जी फायदेशीर वाटते, त्या प्रकोप्य आणि (बाह्य पदार्थांवर) अवलंबून असणार्‍या शांतीला चिकटून राहतो१.(१-१ ही गाथा अत्यंत क्लिष्ट व दुर्बोध आहे टीकाकाराला अनुसरून अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुढील अर्थ ही संभवनीय आहे. प्रकोप आणि आनंद ज्या ठिकाणीं शान्त होतो अशा अवस्थेला चिकटून राहतो.’ अट्टक-वग्गाच्या विपी संत्करणांतही असाच अर्थ अभिप्रेत आहे.) (५)

७८५ कारण सर्व गोष्टींचा विचार करून दृढपणें स्वीकारलेले संप्रदाय उल्लंघणें शक्य नसतें. म्हणून माणूस त्या संप्रदायांमधील बाकीचे पंथ सोडून एक स्वीकारतो.(६)

७८६ पण या जगांत भवाभवाविषयीं प्रकल्पिलेली ही सांप्रदायिकता धूतपापाला मुळींच नसते. तो माया आणि अहंकार सोडणारा कशामुळें सांप्रादायिकता स्वीकारील? तो निश्चळ होय. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel