पाली भाषेतः-

७६९ खेतं वत्थुं हिरञ्ञं वा गवास्सं१(१ म.-गवस्सं.) दासपोरिसं२।(२ म.-दासपरिसं.)
थियो३(३ म.-सिरो.) बन्धु पुथू कामे यो नरो अनुगिज्झति।।४।।

७७० अबला४(४ रो.-अबलाऽब.) न बलीयन्ति मद्दन्ते नं परिस्सया।
ततो नं दुक्खमन्वेति नावं भिन्नभिवोदकं।।५।।

७७१ तस्मा जन्तु सदा सतो कामानि परिवज्जये।
ते पहाय तरे ओघं नावं सिञ्चित्व५(५ म.-सिञ्चित्वा, म., नि.-सित्वाऽव.) पारगू ति।।६।।

कामसुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवादः-


७६९. शेती, घरदार, धन, १गाडी-घोडे (१. मूळ अर्थ-बैल-घोडे.) किंवा दास आणि नोकर, स्त्री आणि बांधव अशा भिन्न भिन्न कामोपभोगांचा जो मनुष्य अत्यन्त लोभ धरतो,(४)

७७० त्याला त्याहून जे अबल असतील ते दाबूं शकतात, व विघ्नें त्याला तुडवितात, आणि त्यामुळें फुटक्या होडींत पाणी जसें यावें तसें दु:ख त्याच्या मागोमाग येतें.(५)

७७१ म्हणून प्राण्यानें सदोदित स्मृतिमान् राहून कामोपभोगांचा त्याग करावा, व होडींत आलेलें पाणी काढून टाकून पार जावें त्याप्रमाणें ते (कामोपभोग) टाकून ओघ तरून जावें.(६)

कामसुत्त समाप्त

पाली भाषेत :-

४०
[२. गुहट्ठकसुत्तं]


७७२ सत्तो गुहायं बहुनाभिछन्नो१। तिट्ठं नरो मोहनस्मिं पगाळ्हो।(१ म.-छन्दो.)
दूरे विवेका हि तथाविधो सो। कामा हि लोके न हि सुप्पहाया।।१।।

७७३ इच्छानिदाना भवसातबद्धा। ते दुप्पमुञ्चा न हि अञ्ञमोक्खा।
पच्छा पुरे वाऽपि अपेक्खमाना२(२ सी.-अपेख)। इमे व कामे पुरिमे व३ जप्पं३।।२।।(३-३ म.-पुरिमे पजप्पं.)

७७४ कामेसु गिद्धा पसुता पमूळ्हा। अ-वदानिया४(४ म.-अप.) ते विसमे निविट्ठा५।(५ म.-वत्था, वित्था.)
दुक्खूपनीता परिदेवयन्ति। किं सु भविस्साम इतो चुतासे।।३।।

मराठीत अनुवाद :-

४०
[२. गुहट्ठकसुत्त]

७७२. देहांत बद्ध झालेला, पुष्कळ (विकारांनी) आच्छादिलेला व मोहांत रुतून गेलेला असा माणूस एकान्तापासून दूर राहतो. कारण कामोपभोगांचा त्याग करणें सोपें नाहीं.(१)

७७३. इच्छेनें प्रेरित व जे संसारसुखांत बद्ध, त्यांना संसारपाशांतून सोडवितां येणें कठिण; कारण जे पुढची किंवा मागची आशा धरतात, आणि अतीतकालीन किंवा वर्तमानकालीन कामोपभोगांत लुब्ध होतात, त्यांची मोकळीक दुसर्‍यांच्या हातून होणें शक्य नाहीं.(२)

७७४. कामोपभोगांत लुब्ध, आसक्त आणि मोहित झालेले व विषम मार्गाला लागलेले ते उपदेशाला योग्य१ [१.अ-वदानिया (अ-वदान्य). टीकाकार वर सांगितल्याप्रमाणें अर्थ करतो. ४८७ गाथेवरील टीप पहा.] नव्हेत. ते (अन्तकालीं) मेल्यावर आपली गति काय होईल अशा विचारानें दु:ख भोगतात आणि शोक करितात.(३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel