पाली भाषेत :-

५०८ को सुज्झति मुच्चति बज्झति च | केनऽत्तना गच्छति ब्रम्हलोकं |
अजानतो मे मुनि ब्रूहि पुट्ठो | भगवा हि मे सक्खि बह्मज्ज दिट्ठो
तुवं हि नो ब्राह्मसमो ति सच्चं | कथं उप्पज्जति ब्रम्हलोक. (जुतीमा१)(१ सी. –जुतिमा, म. – जुतिम,) ||२२||

५०९ यो यजति तिविधं यञ्ञसंपदं (माघा ति भगवा) | आराधये दक्खि२( २-२. रो., अ. दक्खिणेय्येहि)णेय्ये हि२ तादि |
एवं यजित्वा सम्मा याचयोगो | उप्पज्जति ब्रह्मलोकं ति ब्रूमी ति ||२३||

मराठीत अनुवाद :-

५०८. (माघ-) कोण शुद्ध होतो, कोण मुक्त होतो, कोण बन्ध पावतो, मनुष्य कशानें स्वत: ब्रम्हलोकाला जातो हें, हे मुनि, मला माहित नाहीं. म्हणून मीं वाचारलें असतां मला सांग. कारण, आज मला भगवान् जणूं काय साक्षात् ब्रह्माच भेटला. हे द्यतिमन्, तूं खरोखरच आम्हांला ब्रह्मसम आहेस. तेंव्हा मनुष्य ब्रम्हलोकाला कला जातो हें सांग. (२२)

५०९. जो त्रिविध१(१ दान देण्यापूर्वी सन्तोष, देतांना सन्तोष व दिल्यावर संतोष-याला स्त्रिविध यज्ञसंपदा म्हणतात. दीघनिकाय, कूटदनितसुतांत याला ‘तिस्सो विधा’ म्हटलें आहे. (राजवाडे यांचें मराठी भाषांतर पृष्ठ १५९.) यज्ञसंपदेने यज्ञ करतो – हे माघा, असें भगवान् म्हणाला – असा माणूस दक्षिणार्हांची आराधना करील. तो खरा याचकप्रिय याप्रमाणें यज्ञ करून ब्रम्हलोकाला जातो, असें मी म्हणतों. (२३)

पाली भाषेत :-

एवं वुत्ते माघो माणवो भगवन्तं एतदवोच-अभिक्कन्तं भो गोतम-.....
पे..... अज्जतग्गे पणुपेतं सरणं गतं ति

माघसुत्तं निट्ठितं |

३२
[६. सभियसुत्तं]


एवं मे सुतं | एकं समयं भगवा राजगहे विहरति वेळुवने कलन्दकनिवापे | तेन खो पन समयेन सभियस्स परिब्बाजकस्स पुराणसालोहिताय देवताय पञ्हा उद्दिट्ठा होन्ति यो ते सभिय समणो वा ब्राह्मणो वा इमे पञ्हे पुट्ठो व्यकरोति, तस्स सन्तिके ब्रह्मचरियं चरेय्यासी ति | अथ खो सभियो परिब्बाजको तस्सा देवताय सन्तिके ते पञ्हे उग्गहेत्वा, ये ते समणब्राह्मणा संघिनो गणिनो गणाचरिया ञाता यसस्सिनो तित्थकरा साधुसम्मता बहुजनस्स, सेय्यथीदं—पूरणो कस्सपो, मक्खलि गोसालो, अजितो केसकंबली१(१ सी., म.-केसकंबलो.), पकुधो२(२ सी.-ककुधो.) कच्चायनो, संजयो बेलट्ठिपुत्तो३(३म.-बेलट्ठ.), निगण्ठो नातपुत्तो४(४सी.-नाथपुत्तो, म.-नाट.)—ते उपसंकमित्वा ते पञ्ह पुच्छति। ते सभियेन परिब्बाजकेन पञ्हे पुट्ठा न संपायन्ति, असंपायन्ता कोपं च दोसं च अप्पच्चयं च पातुकरोन्ति, अपि च सभियं येव परिब्बाजकं पटिपुच्छन्ति। अथ खो सभियस्स परिब्बाजकस्स एतदहोसिये खो ते भोन्तो समणब्राह्मणा संघिनो गणिनो गणाचरिया ञाता यसस्सिनो तित्थकरा साधुसम्मता बहुजनस्स, सेय्यथीदं-पूरणो कस्सपो....पे.....निगण्ठो नातपुत्तो—ते मया पञ्हे पुट्ठा न संपायन्ति, असंपायन्ता कोपं च दोसं च अप्पच्चयं च पातुकरोन्ति,

मराठीत अनुवाद :-

असें म्हटल्यावर माघ माणव भगवन्ताला म्हणाला- धन्य ! धन्य ! भो गोतम, .... इत्यादि .... आजपासून आमरण शरण गेलेला मी उपासक आहें, असें भगवान् गोतमानें समजावें.

माघसुत्त समाप्त

३२
[६. सभियसुत्त]


असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् राजगृह येथें वेणुवनांत कलंदक निवापांत राहत होता. त्या वेळी जी तिच्या पूर्वजन्मीं सभिय परिव्राजकाची नातलग होती अशा एका देवतेनें “सभिया, जो श्रमण अथवा ब्राह्मण हे प्रश्न सोडवील, त्याचा तूं शिष्य होऊन ब्रह्मचर्याचें पालन कर” असें म्हणून सभिय परि- व्राजकाला कांहीं प्रश्न शिकविले होते. तेव्हां सभिय परिव्राजक त्या देवतेपाशीं ते प्रश्न शिकून, जे श्रमण-ब्राह्मण संघनायक गणनायक, गणाचार्य, प्रसिद्ध यशस्वी तीर्थकर आणि बहुजनांना साधुसम्मत—ते कोणते तर पूर्ण काश्यप, मस्करी गोशाल, अजित केशकम्बली, पकुध कात्यायन, संजय बेलट्ठिपुत्र, आणि निर्ग्रंथ नातपुत्र हे—त्यांजपाशी जाऊन ते प्रश्न विचारीत होता. सभिय परिव्राजकानें प्रश्न विचारले असतां त्यांना उत्तर देतां येत नसे. उत्तर देतां येत नसल्यानें कोप, द्वेष आणि दौमनस्य प्रकट करीत सभिय परिव्राजकालाच उलट विचारीत. तेव्हां सभिय परिव्राजकाला असें वाटलें कीं, जे ते भवन्त श्रमण ब्राह्मण संघनायक, गणन...इत्यादि... निर्ग्रंथ नातपुत्र हे—त्यांना मीं प्रश्न विचारला
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel