पाली भाषेत :-

१०६० विद्वा च सो१(१ म.- यो) वेदगूं२(२ सी.-गु.) नरो इघ। भवाभवे संगमिमं विसज्जा। 
सो वीततण्हो अनिघो निरासो। अतारि सो जातिजरं ति ब्रूमी ति।।१२।।

मेत्तगूमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-

१०६० या जगांत तोच विद्वान् आणि वेदपारग माणूस होय; तोच भवाभवांविषयींची आसक्ति सोडील; तोच निस्तृष्ण, निर्दुःख आणि आशारहित; आणि तोच जन्मजरा तरून जातो, असें मी म्हणतों (१२)

मेत्तगूमाणवपुच्छा समाप्त

६०
[६. धोतकमाणवपुच्छा (५)]

पाली भाषेत :-


१०६१ पुच्छामि तं भगवा ब्रूहि मे तं (इच्चायस्मा धोतको)। वाचाभिकंखामि महेसि तुय्हं।
तव सुत्वान निग्घोसं सिक्खे निब्बाणमत्तनो।।१।।

६०
[६. धोतकमाणवपुच्छा (५)]

मराठीत अनुवाद :-


१०६१ हे भगवन्, मी तुला विचारतों तें मला सांग — असें आयुष्मान् धोतक म्हणाला—हे महर्षें, तुझ्या वचनाची मी अपेक्षा धरतों. तुझा उपदेश ऐकून मी माझ्या निर्वाणाचा मार्ग शिकेन. (१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel