पाली भाषेतः-

६३८ यो इमं पलिपथं दुग्गं संसारं मोहमच्चगा।
तिण्णो पारग१तो(१ म.-पारंगतो.) झायी अनेजो अकथंकथी।
अनुपादाय निब्बुतो तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४५।।

६३९ यो ध कामे पहत्वान अनागारो परिब्बजे।
कामभवपरिक्खीणं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४६।।

६४० यो ध तण्हं पहत्वान अनागारो परिब्बजे।
तण्हाभवपरिक्खीणं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४७।।

६४१ हित्वा मानुसकं योगं दिब्बं योगं उपच्चगा।
सब्बयोगविसंयुत्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४८।।

६४२ हित्वा रतिं च अरति च सीतिभूतं निरूपधिं।
सब्बलोकाभिभुं वीर तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४९।।

मराठी अनुवादः-

६३८. जो या विषममार्गी, दुर्गम, मोहमय संसाराच्या पलीकडे गेला, जो उत्तीर्ण, पार गेलेला, ध्यानरत, निष्कम्प, नि:शंक व उपादानरहित होऊन शांत झालेला, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४५)

६३९. या जगीं जो विषयोपभोग सोडून अनागारिक प्रव्रज्या घेतो, व ज्याची कामवासना व भववासना नष्ट झाली, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४६)

६४०. या जगीं जो तृष्णा सोडून अनागारिक प्रव्रज्या घेतो, ज्याची तृष्णा व भववासना नष्ट झाली, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४७)

६४१. जो मानवी बंधन सोडून दिव्यबंधनाच्या पलीकडे गेला, सर्व बंधनांतून मोकळा झाला, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४८)

६४२. रति आणि अरति सोडून शांत झालेला, निरुपाधि व सर्व लोकविजयी शूर, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel