पाली भाषेतः-

५६७ स्वाक्खातं ब्रह्मचरियं (सेला ति भगवा) संदिट्ठिकमकालिकं।
यत्थ अमोघा पब्बज्जा अप्पमत्तस्स सिक्खतो ति।।२०।

अलत्थ खो सेलो ब्राह्मणो सपरिसो भगवतो सन्तिके पब्बज्जं अलत्थ उपसंपदं। अथ खो केणियो जटिलो तस्सा रत्तिया अच्चयेन सके अस्समे पणीतं खादनीयं भोजनीयं पटियादापेत्वा भगवतो कालं आरोचापेसि-कालो भो गोतम, निट्ठित्तं भत्तं ति। अथ खो भगवा पुब्बण्हसमयं निवासेत्वा पत्तचीवरमादाय येन केणियस्स जटिलस्स अस्समो तेनुपसंकमि। उपसंकमित्वा पञ्ञत्ते आसने निसीदि सद्धिं भिक्खुसंघेन। अथ खो केणियो जटिलो बुद्धपमुखं भिक्खुसंघं पणीतेन खादनीयेन भोजनीयेन सहत्था संतप्पेसि संपवारेसि।

अथ खो केणियो जटिलो भगवन्तं भुत्ताविं ओनीतपत्तपाणिं अञ्ञतरं नीचं आसनं गहेत्वा एकमन्तं निसीदि। एकमन्तं निसिन्नं खो केणि जटिलं भगवा इमाहि गाथाहि अनुमोदि—

मराठीत अनुवाद :-

५६७. मीं ब्रह्मचर्य उत्तम रीतीनें वर्णिलें आहे-हे सेला, असें भगवान् म्हणाला—तें स्वत: साक्षात्कार करून घेण्यास युक्त व अकालफलद आहे. त्याच्यामध्यें सावधानपणें शिकणार्‍याची प्रव्रज्या फलद्रूप होते. (२०)

तेव्हां सेल ब्राह्मणाला आणि त्याच्या विद्यार्थ्यांना भगवन्तापाशीं प्रव्रज्या मिळाली, व उपसंपदा मिळाली. तदनंतर दुसर्‍या दिवशीं केणिय जटिलानें आपल्या आश्रमांत उत्तम खाद्य व भोज्य पदार्थ तयार करून भगवन्ताला ‘भोजन तयार आहे, ही जेवणाची वेळ आहे,’ असें कळविलें. तेव्हां भगवान् सकाळच्या प्रहरीं वस्त्र परिधान करून व पात्र आणि चीवर घेऊन केणिय जटिलाचा आश्रम होता तेथें आला. येऊन भिक्षुसंघासह तेथें मांडलेल्या आसनावर बसला. तेव्हां बुद्धप्रमुख भिक्षुसंघाला कोणिय जटिलानें आपल्या हातानें उत्तम प्रकारचे खाद्यभोज्य पदार्थ यथेच्छ देऊन संतृप्त केलें.

तदनंतर भगवान् जेवून व पात्र (धुवून) बाजूला ठेवून बसला असतां, केणिय जटिल त्याच्याजवळ एका बाजूस एक कमी दर्जाचे आसन मांडून त्यावर बसला. एका बाजूस बसलेल्या केणिय जटिलाचें भगवंतानें या गाथांनी अनुमोदन केलें—
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel