पाली भाषेत :-

६० पुत्तं च दारं पितरं च मातरं धनानि धञ्ञानि च बांधवानि१ (१ रो.-बंधवानि च.)
हित्वान कामानि यथोधिकानि२ (२ म.-यतोधिकानि.) एको चरे    खग्गविसाणकप्पो।।२६।।

६१ संगो एसो परित्तमेत्थ सोख्यं अप्पऽस्सादो दुक्खमेत्थ भिय्यो।
गळो३ (३ सी.-गलो, म.-गण्डो गण्ठो.) एसो इति ञत्वा मुतीमा४ (४ नि.-मुतिमा.) एको चरे खग्गविसाणकप्पो।।२७।।

६२ सदालयित्वा५ (५ म.-पदालयित्वा; Fsb, नि.-सन्दालयित्वा) संयोजनानि जालं६ (६ सी.-जालं भेत्वा, म.-जालं भित्वा, जालं व भित्वा.) व भेत्वा सलिलम्बुचारी।
अग्गीव दड्ढं अनिवत्तमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।२८।।

६३ ओक्खित्तचक्खु७ (७ रो.-चक्खू) न च पादलोलो गुत्तिन्द्रियो रक्खितमानसानो।
अनवस्सुतो अपरिडय्हमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।२९।।

मराठीत अनुवाद :-

६० पुत्रदारा, आईबाप, धनधान्य, बान्धव आणि आपल्या आवाक्यांतील उपभोग्य वस्तू सोडून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२६)

६१. हा संग (आसक्ति) आहे, यांत सौख्य थोंडे, आस्वाद थोडा, आणि यांत दु:ख जास्ती आणि हा गळ आहे, असें जाणून सुज्ञानें गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२७)

६२. पाण्यांत फिरणारा (मासा) जसा जाळें तोडून पार जातो, त्याप्रमाणें संयोजन तोडून, आणि अग्नि जसा जळलेल्या ठिकाणीं परत येत नाहीं, तद्वत् माघारें न येतां, गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२८)

६३. दृष्टि खालीं, पादचांचल्य (इकडे तिकडे फिरण्याची हांव) नाहीं, इंद्रिय स्वाधीन, मन सुरक्षित, विषयाबद्दल अनासक्त आणि मन:सन्ताप नाहीं-असा (होऊन) गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel