पाली भाषेतः-

५९१ यथा करणमादित्तं वारिना परिनिब्बये१।(१ म., सी.-परिनुब्बुतो.)
एवंऽपि धीरो सप्पञ्ञो पण्डितो कुसलो नरो।
खिप्पमुप्पतितं सोकं वातो तूलं व धंसये।।१८।।

५९२ परिदेवं पजप्पं च दोमनस्सं च अत्तनो।
अत्तनो सुखमेसानो अब्बहे२(२ म.-अब्बुहे.) सल्लमत्तनो।।१९।।

५९३ अब्बूळ्हसल्लो असितो सन्तिं पप्पुय्य चेतसो।
सब्बसोकं अतिक्कन्तो असोको होति निब्बुतो ति।।२०।।

सल्लसुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवादः-

५९१. जसें पेटलेलें घर पाण्यानें विझवावें, त्याप्रमाणें धैर्यवान् सुज्ञ, पंडित आणि कुशल माणसानें उत्पन्न झालेला शोक—वारा कापसाला उडवितो तद्वत्—झट्दिशीं नाहींसा करावा.(१८)

५९२. आपणांस सुख व्हावें अशी इच्छा धरणार्‍यानें आपला शोक, प्रजल्प आणि दौ्रमनस्य हें जें अन्त:करणाचें शल्य तें उपटून टाकावें.(१९)

५९३. हें शल्य ज्यानें काढून टाकलेलें आहे व जो अनासक्त आहे, तो चित्ताची शान्ति मिळवून व सर्व शोकांचे अतिक्रमण करून अशोक होतो आणि परिनिर्वाण पावतो.(२०)

सल्लसुत्त समाप्त

पाली भाषेतः-

३५
[९. वासेट्ठसुत्तं]


एवं मे सुतं। एकं समयं भगवा इच्छानगले१(१ रो.-इच्छानंकले.) विहरति इच्छानंगलवनसण्डे। तेन खो पन समयेन संबहुला अभिञ्ञाता अभिञ्ञाता ब्राह्मणमहासाला इच्छानंगले पटिवसन्ति, सेय्यथीदं-चंकी ब्राह्मणो, तारुक्खो ब्राह्मणो, पोक्खरसाति ब्राह्मणो, जानुस्सोणि२(२ रो., म.-जाणुस्सोणि.) ब्राह्मणो, तोदेय्यब्राह्मणो, अञ्ञे च अभिञ्ञाता अभिञ्ञाता ब्राह्मणमहासाला। अथ खो वासेट्ठभारद्वाजानं माणवानं जंघाविहारं अनुचंकममानानं अनुविचरमानानं अयमन्तराकथा उदपादि-कथं भो ब्राह्मणो होती ति। भारद्वाजो माणवो एवमाह-यतो खो उभतो सुजातो होति मातितो च पितितो च, संसुद्धगहणिको, याव सत्तमा पितामहयुगा अक्खितो अनुपक्कट्ठो३(३ म.-अनुपकुट्ठो.)
जातिवादेन, एत्तावता खो ब्राह्मणो होती ति। वासेट्ठो माणवो एवमाहयतो खो भो सीलवा च होति वतसंपन्नो४(४ सी.-वत्तसपन्नो.) च, एत्तावता खो ब्राह्मणो होती ति। नेव खो असक्खि भारद्वाजो माणवो वासेट्ठं माणवं सञ्ञपेतुं, न पन असक्खि वासेट्ठो माणवो भारद्वाजं माणवं च सञ्ञपेतुं। अथ खो वासेट्ठो माणवो भारद्वाजं माणवं आमन्तेसि—अयं खो भारद्वाज समणो गोतमो सक्यपुत्तो सक्यकुला पब्बजितो इच्छानंगले विहरति इच्छानंगलवनसण्डे, तं खो पन भवन्तं गोतमं एवं कल्याणो कित्तिसद्दो अब्भुग्गतो....पे...बुद्धो भगवा ति, आयाम भो भारद्वाज, येन समणो गोतमो तेनुपसंकमिस्साम, उपसंकमित्वा समणं गोतमं एतमत्थं पुच्छिस्साम, यथा नो समणो गोतमी ब्याकरिस्सति तथा नं धारेस्सामा ति। एवं भो ति खो भारद्वाजो माणवो वासेट्ठस्स पच्चस्सोसि। अथ खो वासेट्ठ-भारद्वाजा माणवा येन भगवा तेनुपसंकभिसु, उपसंकमित्वा भगवता सद्धिं सम्मोदिसुं, सम्मोदनीयं कथं साराणीयं वीतिसारेत्वा एकमन्तं निसीदिंसु। एकमन्तं निसिन्नो खो वासेट्ठो माणवो भगवन्तं गाथाय अज्झभासि—

मराठी अनुवादः-

३५
[९. वासेट्ठसुत्त]


असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् इच्छानंगल येथें इच्छानंगल उपवनांत राहत होता. त्या वेळीं इच्छानंगलांत कित्येक प्रसिद्ध श्रीमंत ब्राह्मण राहत असत. ते हे—चंकी ब्राह्मण, तारुक्ष ब्राह्मण, पुष्करसादी ब्राह्मण, जानुश्रोणी ब्राह्मण, तौदेय ब्राह्मण आणि तसेच दुसरे कांहीं प्रसिद्ध श्रीमंत ब्राह्मण राहत. तेव्हां वासेष्ठ आणि भारद्वाज हे दोन विद्यार्थी फिरावयास निघाले असतां त्यांच्यांत ब्राह्मण कसा होतो, ही गोष्ट निघाली. भारद्वाज विद्यार्थी म्हणाला—आईच्या व बापाच्या बाजूनें अशीं दोन्हीं कुळें शुद्ध असल्यामुळें ज्याचा जन्म पवित्र, सात पिढ्यांपर्यंत ज्याच्या कुळाला जातिप्रवाद१ (१ म्हणजे जन्मासंबंधीचा प्रवाद.) दोष लावतां येत नाहीं, तोच ब्राह्मण होय. वासेष्ठ विद्यार्थी म्हणाला-जो शीलवान् व व्रतसंपन्न तोच ब्राह्मण होय. भारद्वाज विद्यार्थी वासेष्ठ विद्यार्थ्यांची समजूत घालूं शकला नाहीं, आणि वासेष्ठ विद्यार्थीही भारद्वाज विद्यार्थ्यांची समजूत घालूं शकला नाहीं. तेव्हां वासेष्ठ विद्यार्थी भारद्वाज विद्यार्थ्याला म्हणाला—हे भारद्वाजा, हा श्रमण गोतम शाक्य-पुत्र शाक्य कुळांतून परिव्राजक झालेला इच्छानंगल येथें इच्छानंगल उपवनांत राहत आहे, आणि त्या भवान् गोतमाची अशी कल्याणकारक कीर्ति फैलावली आहे की,.... इत्यादि२ (२ सेलसुत्त (अनु. ३३), पहिलाच परिच्छेद पहा.)....बुद्ध भगवान् आहे, हे भारद्वाजा, चल, आपण श्रमण गोतमापाशीं जाऊं, जाऊन श्रमण गोतमाला ही गोष्ट विचारूं, व श्रमण गोतम जशी व्याख्या करील तसा अर्थ समजूं. “ठीक आहे” असें भारद्वाज विद्यार्थी वासेष्ठ विद्यार्थ्यास उत्तरादाखल बोलला. त्यावर वासेष्ठ व भारद्वाज विद्यार्थी भगवंतापाशीं आले; येऊन त्यांनीं भगवन्ताला कुशल प्रश्न विचारले, व कुशलप्रश्नादिक संभाषण आटोपून ते एका बाजूला बसले. एका बाजूस वासेष्ठ विद्यार्थी भगवन्ताला गाथेनें म्हणाला—
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel