“बघ तुला जमेल तें. परंतु अजून तू लगान आहेस जगन्नाथ. जरा मोठा असतास तर!”

दोघे मित्र घरी गेले. जगन्नाथ आपल्या गच्चीवर फे-या घालीत होता. गच्चीत आरामखुर्चीत पंढरीशेट बसले होते. शांतपणे एक शाल अंगावर घेऊन पडून राहिले होते. एकदम त्यांच्याजवळ गेला. त्यांच्या पायांजवळ बसला. त्याने त्याचे पाय धरले.

“काय रे जगन्नाथ?”

“बाबा, तुमच्याजवळ एक मागणार आहे.”

“काय हवे बाळ? सायकल का घड्याळ?”

“तसले काही नको.”

“मग काय हवे?”

“माझ्या मित्राची अब्रू.”

“म्हणजे?”

“बाबा, गुणा माझा मित्र आहे. त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही. त्याचे दु:ख ते माझे. आज तो माझ्याजवळ रडला. त्यांच्यावर फिर्याद करण्यांत आली आहे. दादाने त्याच्या वडिलांवर फिर्याद केली आहे. घराशिवाय त्यांच्याजवळ काय आहे? त्या घरावर जप्ती न्याल, लिलांव पुकाराल. गुणाचे आईबाप दु:खाने मरतील. बाबा, ही फिर्याद काढून घ्या.”

“आणि पैसे?”

“आपणांला का खायला वाण आहे? दुस-याचे प्राण पिळून का पैसे घ्यायचे?”

“अशानें जगन्नाथ कसे होईल? तुझे भाऊ अशा व्यवहाराला कशी मान्यता देतील? ते आता कर्तेसवरते झाले. असा नको हट्ट धरूं.”

“बाबा, आज ना उद्यां आम्ही वेगळे होऊंच ना?”

“मग?”

“माझ्या वाट्याला काही सावकारी येईलच ना? रामरावांकडची बुडीत सावकारी माझ्या वाट्याला द्या. त्यांत काय बिघडले?”

“तुझे भाऊ या गोष्टीला तयार होणार नाहींत.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel