येथुनि पुढे बरें होईल । भक्तिसुखे दोंद वाढेल ।
फेरा चौर्यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥ १ ॥
मी आलो रायाचा जोशी । होर ऎका दादांनो ॥ध्रु॥
मनाजी पाटील देहगावचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारिण । झगडा घाली मोठी दारुण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३।
एका जनार्दन कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्गुरुंसी । फेर चुकवा चौर्याऎंशी ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.