गांजितां प्रल्हादु । तुझा घेतला छंदु । त्याचा निरसिला बाधु । तैसा पावे तूं सन्निधु ॥ १ ॥
वेगीं येवो मुकुंदा । धांवे पावे गोविंदा । करी घेऊनियां गदा । छेदी सकाम बाधा ॥ २ ॥
दावाग्नी गोपाळ । वेढिले सकळ । ते त्वां गिळियेले ज्वाळ । तैसा पावे तात्काळ ॥ ३ ॥
गरुडा सांडोनी मागें । उडी घातली श्रीरंगें । गज उद्धरिला अंगें । तैसा पावे लागवेगें ॥ ४ ॥
दुर्वास भोजनीं । आला रात्रीं माध्यानीं । धर्मशापाची बाधणी । निरसली भेटी देउनि ॥ ५ ॥
भवभय अद्भुत । नामस्मरणे निरसे सत्य । एका जनार्दनीं प्रतीत । आम्हां नामस्मरणें ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.