फु फु फु फु फुगडी गे । दोघी घालूं झगडी गे । जाउनी महाद्वारी गे । तेथें घालीन फुगडी गे ॥ १ ॥
दोन्ही हस्तक धरून गे । तेथें घालीन फुगडी गे ॥ध्रु०॥
विटेवरील पाऊल येऊं गे । राहो माझे ह्रदयीं गे । जेथें वैष्णवांचा भार गे । तेथें घालीन फुगडी गे ॥ २ ॥
जेथें नामघोष गे । तेथें करीन झगडी गे । एका जनार्दनीं पाहून गे । मन माझें धालें गे ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.