एका जनार्दनाचे लग्नसिद्धीसी । घटितार्थ पहावया मिनले चवदा । भुवनांचे ज्योति ज्योतिषी ॥ १ ॥
योग तोही एक तीथ तीहि एक । राशी तेंही एक नक्षत्र तेंही एक । सद्गुरुचरणीं एकाएक तोही जाला ॥ २ ॥
वर्ष तेंही एक मास तोही एक । बारा योगे पाहतां एकाएक जाले ॥ ३ ॥
घटिका तेहीं एक पळ तेहीं एक । शोधितां सूक्ष्म एका एकचि जाले ॥ ४ ॥
पहातां जनीं जनार्दनीं उभविली गुढी ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.