जोहार मायबाप धनी । मनाजीबावा कुळकर्णी ।
गांवचे पाटील जिवाजी नेमुनी । माझे धन्यांनीं ठेविले की जी मायबाप ॥ १ ॥
जोहार मायबाप जोहार । जोहार मायबाप जोहार ॥ ध्रु० ॥
गांवचे देसाई ठाणेदार । सबनीस आणि शेखदार ।
करती रयतेचा कारभार । परि धन्याचा विचार न करती की० ॥ २ ॥
खरीप रब्बी पिकाचे दाणे । सारा सारून भरा केणें ।
रुजू घेतील यमाजी संपूर्ण । बाकी निघतां नेती बांधून की० ॥ ३ ॥
नेउनी घालतील खोडा बेडी । बाकीची न चुकेची दमडी ।
मग काय तुमची गोडी । एका जनार्दनी करा जोडी की जी मायबाप ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.