जोहार मायबाप जोहार । सर्व शरीराचा कारभार । मी आहे नफर साचार । मी वेसकर आलों ॥ १ ॥
मी निजानंदीचा रहिवाशी । धांवत आलों संतांपाशीं । सांगतां तें मानसीं । दृढ धरा ॥ २ ॥
माझे धनी मोठे थोर । त्यांचा मी आवडता फार । तेथील सारा कारभार । मीच करितों ॥ ३ ॥
माया ही धन्याची राणी । इची संगत नका धरूं कोणी । थोर थोर पडले व्यसनीं ॥ ४ ॥
विश्वामित्र पाराशर । नारदादी ऋषीश्वर । ब्रह्मा विष्णु शिव साचार ॥ ५ ॥
इंद्र चंद्र महामती । पाडिले विषयावरतीं । एका जनार्दनीं धरा भक्ती । मी वेसकर आलों ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.