आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।
तेणे चुकतीचौर्याऎंशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥१॥
होरा ऎका दादांनो ॥ध्रु॥
नका जाऊ मना मागे । थोर थोरा जाहले दगे ।
मी बोलत नाही वाउगे । सावध रहा दादांनो ॥२॥
वासना वाईट ही बा थोर । पुरविले लहान थोर ।
फिरतीचौर्याऎंशी लक्ष घर । पडाल फशी दादांनो ॥३॥
एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी ।
रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.