तुमचें गूज तुम्हां बोले । आमुचें त्यांत काय गेलें । वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें कुत्रें खादलें ॥ १ ॥
नवल मोठें जाणा । कान्होबा नवल मोठें जाणा । तुमच्या तुम्ही जाणा खुणा ॥ध्रु०॥
ओस गांवचा एक मारुती । त्याचा बाप चोरी करी दिवसराती । त्यासी पंचावन सांगाती । गांवच्या कुळकर्ण्याची फजिती ॥ २ ॥
गंगे आला महापूर । वाहून गेलें तेथें अंबर । चंद्रसूर्य दारोदार । हिंडो लागलीं पांच पोरें ॥ ३ ॥
त्याला साक्षी एक जांवई । सासूबाई देती ग्वाही । लेक आमुची ढालगज पाहीं । एका शरण जनार्दन पायीं ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.