आम्ही नवल देखिलें भाई । मुंगीनें हत्तीशीं केली लढाई । उंटाचा कान धरूनि चिमाई । घरोघरीं खातसे ॥ १ ॥
सांगा आमुचें कोडें । लांडग्यासाठीं शेळी रडे । कोल्हे हांसतसे बापुडें । उंदीर रेडे खेळती ॥ २ ॥
वरले गांवींचा एक हत्ती । नित्य खातो प्रजापती । सिंह तया येतो काकुळती । हंस रुसे कागाप्रती ॥ ३ ॥
एका जनार्दनाचें कोडें । उगवी तोचि जाणा वेडे । शहाणे त्यासी नुमगे गाढें । अर्थ पहातां चुके लिगाड ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.