''हा तरुण ब्रह्मचारी आला. नवीन सुंदर वस्त्रे त्याने परिधान केली आहेत. त्याने यज्ञोपवीत घातले आहे, तो आता नवीन जन्म घेत आहे. तो कल्याणाकडे जात आहे. ''
''तं धीरास:कवय:उन्नयन्ति
स्वाध्यो मनसा देवयन्त:।''
संयमी ज्ञानवंत गुरु त्याला उन्तीप्रत नेवोत, तो तरुण अध्ययन करुन, मनाने एकाग्र होऊन देवांना आवडणार होवो, तेजस्वी होवो. ''
अग्नीमध्ये समिधा होमिल्यावर जी प्रार्थना ब्रह्मचया-याने म्हणावयाची, ती तेजस्वी आहे.
''मयि मेंधा मयि प्रज्ञां मय्यग्निस्तेजो दधातु
मयि मेधां मयि प्रज्ञां मयीन्द्र इन्द्रियं दधातु
मयि मेधां मयि प्रज्ञां मयि सूर्यो भ्राजो दधातु
यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम्
यत्ते अग्ने वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासम्
यत्ते अग्ने हरस्तेनाहं हरस्वी भूयासम्''
''अग्नी माझ्या ठिकाणी बुध्दी, विचारशक्ती व तेज ठेवो. इंद्र माझ्या ठिकाणी बुध्दी, विचारशक्ती व सामर्थ्य ठेवो. सूर्य माझ्या ठिकाणी बुध्दी, विचारशक्ती व तेज ठेवो. हे अग्ने! तुझ्या तेजाने मला तेजस्वी होऊ दे. तुझ्या विजयी तेजाने मला वर्चस्वी होऊ दे. सर्व खळमळ जाळून टाकणा-या तुझ्या तेजाने मला खळमळ जाळून टाकणारा होऊ दे. ''
बटू मेखला व कौपीन धारण केल्यावर हातात दंड घेतो. त्या वेळेस तो मंत्र म्हणतो,
''अदान्तं दमयित्वा मां मार्गे संस्थापयन् स्वयम् ।
दण्ड:करे स्थितो यस्मात्तस्माद्रक्ष यतो भयम ।:
हा दंड असंयत असलेल्या मला संयम शिकवील. हे दण्डा! कोठूनही भय येवो, त्यापासून तू माझे संरक्षण कर.
उपनयनाच्या शेवटी मेधासुक्त म्हणतात: