७९. मैत्रीचा प्रभाव.

(कुरुंगमिगजातक नं. २०६)


एकदां बोधिसत्त्व कुरुंगमृग होऊन एका अरण्यांत सरोवराच्या कांठी रहात होता. तेथेंच एका वृक्षावर एका शतपत्र पक्षानें आपलें घरटें बांधले होतें; आणि त्या सरोवरांत एक कांसव रहात होता. या तिघांची अत्यंत मैत्री जडली होती. एके दिवशीं एक पारधी त्या सरोवराच्या कांठीं हरणाला पकडण्यासाठीं जाळें पसरून घरीं गेला. रात्रींच्या पहिल्या प्रहरीं बोधिसत्त्व पाणी पिण्यासाठीं जात असतां त्या जाळ्यांत सांपडला; आणि आपण जाळ्यांत सांपडलों हें आपल्या मित्रांस कळविण्यासाठीं तो मोठ्यानें ओरडला. तेव्हां सरोवरांतून कांसव वर आला, व शतपत्र पक्षी आपल्या घरट्यांतून खालीं उतरला. बोधिसत्त्वाची ही दीनदशा पाहून शतपत्र कांसवाला म्हणाला, ''पहांट होण्यापूर्वी जर आमच्या मित्राला या पाशांतून मुक्त केलें नाहीं तर तो पारध्याच्या तावडींत सांपडून प्राणास मुकेल. आतां तूं आपल्या दांतांनीं याचे पाश तोडण्यास आरंभ कर, आणि हें काम लवकर आटप.''

कांसव म्हणाला, परंतु माझे दांत कांहीं बळकट नाहींत. माझ्या गतीप्रमाणेंच पाश तोडण्याचें कामहि मंदपणें चालेल, आणि इतक्यांत पारधी आला तर माझे सर्व श्रम वांया जातील.''

शतपत्र म्हणाला, ''पारधी लवकर येईल याबद्दल तूं काळजी करूं नकोस तो अरुणोदयापूर्वी येणार नाहीं. याबद्दल मी हमी घेतों; आणि त्याला जेवढा उशीर लावतां येईल तेवढा लावण्याचा मी प्रयत्‍न करतों. पण तूं हे पाश तोडण्याचें काम जारीनें चालव.''

कांसवानें एकामागून एक पाश तोडण्यास सुरुवात केली. शतपत्र पारध्याच्या दारांत जाऊन त्याची वाट पहात बसला. पहांट होण्यापूर्वी पारधी हातांत मोठी सुरी घेऊन तलावाच्या कांठीं जाण्यास निघाला. इतक्यांत शतपत्रानें मोठ्यानें शब्द काढून त्याच्या कपाळावर जोरानें चंचुप्रहार केला. बिचारा पारधी आपणाला मोठा अपशकुन झाला असें वाटून पुनः घरांत शिरून निजला, आणि मनांतल्या मनांत म्हणाला, ''आज या अमंगल पक्ष्यानें माझ्यावर टोंच मारून मला अपशकुन केला आहे त्यामुळें शिकार नीट साधेल किंवा नाहीं याची मला काळजी वाटते; तथापि थोड्या वेळानें मागल्या दरवाजांतून निघून जाऊन अपशकुन न होईल असें केलें पाहिजे.''

असा विचार करीत तो झोंपी गेला. पुनः अरुणोदयानंतर उठून मागल्या दरवाज्यांतून जाण्याच्या बेतांत होता. पण तेथेंहि शतपत्रानें मोठ्यानें ओरडून त्याच्या कपाळावर चोंच मारली. पारधी संतापून म्हणाला, ''या दुष्ट अमंगल पक्षानें तर माझा पिच्छाच पुरवला ! तथापि थोडा उजेड झाल्यावर हा जवळ आल्यास याची चांगली खोड मोडून मग शिकारीच्या शोधार्थ जाईन.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel