११८. पात्रापात्रीं उपदेश व त्याचीं फळे.

(अवारिय जातक नं. ३७६)


एकदां बोधिसत्त्व ब्राह्मणकुलांत जन्मून तरुणपणीं सर्व शिल्पांत पारंगत झाला; व प्रपंचाला कंटाळून त्यानें तापसवेषानें हिमालयाचा मार्ग धरिला. कांहीं काळ तेथें राहिल्यावर तो वाराणसीला आला. वाराणसीचा राजा त्याचे स्वार्थत्यागादि अनेक सद्गुण पाहून प्रसन्न झाला आणि मोठ्या आग्रहानें त्यानें आपल्या उद्यानांत बोधिसत्त्वाला ठेऊन घेतलें. बोधिसत्त्व राजाला वारंवार असा उपदेश करीत असे कीं, ''महाराज, कोणावर रागावूं नकोस. कोणावर रागावूं नकोस. जो राजा दुसरा रागावला असतां स्वतः रागवत नाहीं तोच सर्व राष्ट्राला पूज्य होतो. अरण्यांत किंवा नगरांत, जलीं किंवा स्थलीं माझा तुला हाच उपदेश आहे कीं, तूं कोणावर देखील रागावूं नकोस.''

बोधिसत्तवाच्या उपदेशानें राजा फारच सात्विक झाला; व त्या योगें सर्व प्रजेची त्यावर अत्यंत भक्ति जडली. आपणाला तपस्व्याच्या उपदेशानें एवढा फायदा झालेला पाहून राजाला त्याच्या ॠणांतून कसें मुक्त व्हावें हेंच सुचेना. शेवटीं त्यानें असा निश्चय केला कीं, बोधिसत्त्वाला एका मोठ्या गांवची जहागीर देऊन टाकावी व राजसंन्याशासारखी त्याची मोठी बरदास्त ठेवावी. आपला मनोदय जेव्हां राजानें बोधिसत्त्वाला कळविला तेव्हां तो म्हणाला, ''महाराज, तपस्व्यानीं श्रीमंत व्हावे ही मोठी विडंबना होय. मी द्रव्यार्जन करण्यास समर्थ असतां तपस्वी झालों याचें कारण हेंच कीं, प्रपंचतृष्णेनें मला घेरून टाकू नये. म्हणून मी तुला एवढेंच सांगतों कीं, मला पुनः प्रपंचपाशांत गोंवण्याचा प्रयत्‍न करूं नकोस.''

राजानें बोधिसत्त्वाच्या इच्छेप्रमाणें त्याला जहागीर देण्याचे तहकूब केलें, व पूर्वीप्रमणेंच आपल्या उद्यानांत त्याच्या मर्जीप्रमाणें रहाण्यास सांगितलें. परंतु राजाच्या तोंडून बोधिसत्त्वाची फार स्तुति होऊं लागल्या कारणानें दरबारांतील लोक खुशीनें म्हणा, किंवा नाखुषीनें म्हणा, बोधिसत्त्वाच्या दर्शनाला येऊं लागले. जो तो राजासमोर बोधिसत्त्वाची स्तुतीच करूं लागला. उद्देश हाच कीं, राजेसाहेबांची कशी तरी मर्जी संपादन करावी. पण आमच्या बोधिसत्त्वाला अशा प्रकारची स्तुति आणि हांजीहांजी मुळींच आवडत नसे. त्याला या गोष्टीचाच नव्हे तर वाराणसीच्या आसपास देखील रहाण्याचा तिटकारा आला, आणि राजा आपल्या गमनाला अंतराय करील म्हणून त्याला न सांगतां केवळ उद्यानपालकाला सांगून तो एकटाच यात्रेला निघाला. कांहीं अंतरावर गेल्यावर गंगेच्या पार जाण्यासाठीं त्याला एक तरी लागली. तेथल्या नावाड्याचें नांव अवार्य असें होतें. अवार्यानें बोधिसत्त्वाला फारशी तक्रार न करितां परतीराला नेलें. परंतु तेथें गेल्यावर तो द्रव्य मागूं लागला. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''बा नाविका, तुला या तुझ्या धंद्यांत व इतरत्र उपयोगी पडेल असें धन देतों तें ग्रहण कर.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel